Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. महापालिकेकडून उपलब्ध आणि राखीव पाणी साठ्याचे 31 जुलैपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. महापालिकेकडून उपलब्ध आणि राखीव पाणी साठ्याचे 31 जुलैपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे. मात्र नागरिकांना पाणी जपून वापरायचा आव्हान सुद्धा दिलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालिकेची भिस्त मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आहे. तर या सातही धरणांमध्ये 16.48 टक्के इतके पाणीसाठा आहे आणि हवामान खात्याने जे अंदाज दिलेला आहे जूनमध्ये पावसाचा त्यावरच पालिकेची भिस्त असल्याची पाहायला मिळतंय.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मुंबईकरांनी काळजी करु नये पण सर्वांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापर करावा असा आव्हान महानगरपालिकेने केले आहे. तर यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचं निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुंबईकरांना मोठी दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com