Onion Market : कांद्याची घसरण सुरूच! शेतकऱ्यांचा संताप, लिलाव पाडला बंद

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून आज कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 950 रुपये इतकंच भाव मिळाला.
Published by :
Dhanshree Shintre

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून आज कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 950 रुपये इतकंच भाव मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला 1600 रुपये तर काल 1150 रुपये भाव मिळाला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे 700 रुपये तर कालच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाली असून लासलगाव सोबत मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात देखील हीच परिस्थिती असून रोज कांद्याच्या भावात घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहे आवक मोठया प्रमाणात होत असल्यामुळे भाव गडगडल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com