Sanjay Raut On Vidhansabha | MVA | मविआच्या जागावाटपाची चर्चा आजपासून सुरू होणार; राऊतांचे वक्तव्य

मविआतील जागावाटपांच्या चर्चांना चांगलाच वेग येत आहे. मविआची आज दुसरी एक बैठक होणार होती.
Published by :
Dhanshree Shintre

मविआतील जागावाटपांच्या चर्चांना चांगलाच वेग येत आहे. मविआची आज दुसरी एक बैठक होणार होती. दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा जागावाटपासंदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होणार आहे.

आज बैठक आहे आम्ही चर्चा करु तीन पक्ष एकत्र येतील. आम्ही काँग्रेस पक्षाला सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा याच्यामध्ये आज सहभाग आहे. इतर लहान पक्ष आमच्यामध्ये सहभागी होतील. आजपासून 2-3 दिवस आम्ही बैठका घेणार आहोत. काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे पण त्यांना आम्ही सांगितलं की लवकर आपण बैठक घेऊन जागावाटपावर निर्णय घेतला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com