व्हिडिओ
Parivartan Mahashakti Melava: परिवर्तन महाशक्तीचा संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा
परिवर्तन महाशक्तीचा संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा होणार आहे.
परिवर्तन महाशक्तीचा संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा होणार आहे. स्वराज्य संघटना प्रमुख संभाजी राजे, प्रहारचे प्रमूख बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यासाठी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात पहिला मेळावा होणार आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकी आधी ही नवी युती तर तिसरी आघाडी आहे. तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर संभाजी नगरात परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य संघटना स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र राज्य समिती आणि भारतीय जवान किसान पार्टी यांच्यात तिसरी आघाडी समावेश आहे.