सिद्धार्थ-कियारा यांच्या हळदी समारंभाचा पहिला व्हिडिओ आला समोर
Admin

सिद्धार्थ-कियारा यांच्या हळदी समारंभाचा पहिला व्हिडिओ आला समोर

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 150 मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांचा हळदी समारंभ होणार आहे. हळदी समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली असून यावेळी एक व्हिडिओही समोर आला आहे. सिड-कियाराच्या हळदी समारंभाच्या आधी, सूर्यगड पॅलेसच्या आतून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हळदी समारंभाची तयारी सुरु असलेले दिसून येत आहे. यामध्ये पिवळ्या रंगाची थीम घेऊन संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली आहे.

12 फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे बॉलीवूड स्टाइल मुंबईत रिसेप्शन होणार आहे. काल संध्याकाळी संगीत समारंभ व्यतिरिक्त सोमवारी होणारी वधू कियारा अडवाणी हिचा चुडा सोहळा पार पडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com