Deepak Kesarkar on Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या मोठ्या लढ्याला यश मिळालं'

जो मराठा समाजाचा फार मोठा लढा होता जो मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली लढवला गेला आज त्याला यश मिळतंय
Published by :
Dhanshree Shintre

दीपक केसरकर म्हणाले की, एक गोष्ट आनंदाची आहे की आज जो मराठा समाजाचा फार मोठा लढा होता जो मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली लढवला गेला आज त्याला यश मिळतंय आणि हे सगळं करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची खूप मोठी भूमिका राहलेली आहे. दिवसरात्र सातत्याने ते संपर्कात होते. वेगवेगळे निर्णय त्यांनी तातडीने घेतले. त्याच्यामुळे हा चांगला निर्णय होऊ शकला आणि आता पुढच्या कालावधीमध्ये पुढचा टप्पा पण चांगल्यातरीने होईल अशी खात्री आहे. आपण ओबीसीला जेवढे देतो तेवढी प्रत्येक गोष्ट ही मराठा समाजाला दिली जाईल. किती भार येतो हे गरजेचे नाही मुख्यमंत्री महोदयनी जो शब्द दिला तो पाळण्यात येईल. आपण ओबीसीला जे सुविधा देतो ते मराठा समाजाच्या मुला-मुलींना देण्यात येईल असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com