Maharashtra News : भाषातज्ज्ञ गणेश देवींचे व्याख्यान अचानक रद्द

पवईच्या आयआयटी प्रशासनाने प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पवईच्या आयआयटी प्रशासनाने प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. आज आयआयटीमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ते रद्द करत असल्याचे ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. गणेश देवी हे 'द क्रायसिस विदीन: ऑन नॉलेज अॅण्ड एज्युकेशन इन इंडिया', या विषयावर बोलणार होते. आयआयटीतील व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते. यासाठी गणेश देवी यांना दोन महिन्यांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. पवईच्या इंडियन इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) प्रशासनाने प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. 31 जानेवारीला व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com