High Court On Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यामधील मृत 26 जण शहीद नाही, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने फेटाळली याचिका

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना 'शहीद' घोषित करण्याची मागणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली.

पहलगाम येथे 22 एप्रिलला पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एका परदेशी पर्यटकासह 26 पर्यटक मृत्युमुखी पडले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना 'शहीद' घोषित करण्याची मागणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली.

“त्यांना शहीद घोषित करणे कलम 226 अंतर्गत येते का? कृपया तुमच्याकडे असे एखादे उदाहरण असेल तर द्या. ही एक प्रशासकीय बाब आहे आणि धोरणात्मक प्रश्न आहे आणि तो निर्णय घेण्याचे काम कार्यकारी मंडळावर सोपवले पाहिजे. आपण ते काम करू शकतो का?”, असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com