संशोधक विद्यार्थिनीनं अजित पवारांना सुनावलं, म्हणाली पवारांना पीएचडीचा अर्थ तरी कळतो का?

उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा द्या या घोषणांनी कोल्हापूरचा शिवाजी विद्यापीठ परिसर सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी दणाणून सोडलं आहे.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा द्या या घोषणांनी कोल्हापूरचा शिवाजी विद्यापीठ परिसर सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी दणाणून सोडलं आहे. सारथीचे संशोधक विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाविरोधात कोल्हापुरात सारथी संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाबाहेर अजित पवारांच्या विरोधात निदर्शनं करत त्यांचा निषेध केला आहे. जर संशोधक काही दिवे लावणार नसतील तर, मग अजित पवार राज्यात भावी मुख्यमंत्री होऊन काय दिवे लावणार, त्यांनी कशासाठी बंडखोरी केली यांचं उत्तर द्यायला हवं, अशा भावना संशोधक विद्यार्थी व्यक्त करत आहेत. दरम्यान आक्रमक झालेल्या या विद्यार्थ्यांनी हातात अजित पवारांच्या निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com