Cabinet Expansion : 'या' तारखेला नागपुरात होणार मंत्र्याचा शपथविधी
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणंत खातं मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार - सूत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे यापूर्वीच म्हणाले होते. अशातच येत्या १५ तारखेला नागपुरात मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या १६ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच १५ डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.