Sangli : कृष्णा नदीकाठी रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार; नागरिकांची प्रचंड गर्दी

सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीत भव्य होडयांच्या शर्यती पार पडल्या आहेत
Published by  :
Team Lokshahi

सांगली: सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीत भव्य होडयांच्या शर्यती पार पडल्या आहेत. कृष्णा नदीमध्ये पार पडलेल्या या थरारक होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पावसाळा सुरू झाला की सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो. यंदाही पावसाळ्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेच्या कृष्णा घाट या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर व्हनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

नदी पात्रात तीन किलोमीटर अंतराच्या चार फेरी मारण्याच्या शर्यतीत मिरज तालुक्यातल्या कवठेपिराने येथील सप्तर्षी बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावला तर समडोळी बोट क्लबने नदुसरा आणि तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार व मान्यवरांच्या रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com