मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी जाणार अयोध्येला

अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. बालस्वरुप रामलल्लाच्या मूर्तीची पतंप्रधानांनी प्राणप्रतिष्ठा केली.
Published by :
Team Lokshahi

अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. बालस्वरुप रामलल्लाच्या मूर्तीची पतंप्रधानांनी प्राणप्रतिष्ठा केली. या सोहळ्याला देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण होते. मात्र संपूर्ण मंत्रिमंडळासह जाण्याचे तिघांनीही निश्चित केले असल्यामुळे राज्याचे मंत्रिमंडळ अयोध्येला केव्हा जाणार याची उत्सूकता होती. अखेर राज्याचे प्रमूख अयोध्येला जाण्याची तारीख ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com