Jayakwadi Water Issue : पाणी प्रश्न पेटणार! मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून आज रास्ता रोको

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आज सर्वपक्षीय नेते आंदोलन करणार आहेत.
Published by  :
Team Lokshahi

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आज सर्वपक्षीय नेते आंदोलन करणार आहेत. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी पाणी रोखून धरल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको करणार आहेत. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरून संघर्ष पेटला. जलसंपदा विभागाचे अधिकारी पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com