व्हिडिओ
Sanjay Raut : "तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..",राऊत यांचा शिंदे यांच्यावर निशाणा
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय. एकनाथ शिंदे हे लाचार, लोचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान पाहण्यापेक्षा, थोडा जरी स्वाभिमान असेल तर राजीनामा द्या, असं संजय राऊत म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. सोबत येण्यासाठी भाजपकडून दबाव आणला गेला. पण आम्ही गद्दार नाही, शिवसेनेशी प्रतारणा करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.