Vidhansabha Session : संसदेत आजही गोंधळाची शक्यता ; नीटसह अन्य मुद्द्द्यांवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक

संसदेमध्ये आजही गोंधळाची शक्यता आहे. नीटसह अन्य मुद्द्द्यांवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक होताना दिसून येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

संसदेमध्ये आजही गोंधळाची शक्यता आहे. नीटसह अन्य मुद्द्द्यांवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक होताना दिसून येत आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये नीटवर चर्चा करा अशी मागणी विरोधकांनी केली होती. तसा प्रस्ताव सुद्धा माडला होता.राहुल गांधी यांनी स्वतः जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही नीटचे जे पेपर लीक प्रकरण आहे त्याच्यामध्ये चर्चा करण्याची मागणी केली होती.

पण त्यानंतर सभागृहाचं कामकाज हे सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आणि आज सोमवार आहे त्यामुळे विरोधक आता नीटच्या मुद्द्द्यांवर अडून राहतात का? चर्चेची मागणी ते पून्हा एकदा करतात का? दरम्यान विरोधकांकडून सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सोमवारी ही गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com