Dawood Ibrahim: दाऊद- शकीलमध्ये तेढ निर्माण झाल्याची माहिती

पाकिस्तानातील कराचीत लपलेला अतिरेकी दाऊद इब्राहिमने डी-कंपनीची धुरा धाकटा भाऊ अनीस कासकरकडे सोपवली आहे.
Published by :
Team Lokshahi

पाकिस्तानातील कराचीत लपलेला अतिरेकी दाऊद इब्राहिमने डी-कंपनीची धुरा धाकटा भाऊ अनीस कासकरकडे सोपवली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी हा दावा केला आहे. ही जबाबदारी आतापर्यंत दहशतवादी आणि दाऊदचा सर्वात विश्वासू छोटा शकील सांभाळत होता. मात्र, दाऊद आणि शकील यांच्यात २ वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याने कामावर परिणाम व्हायचा. म्हणून दाऊदने शकीलला बाजूला केले. अनीस कराचीतून मुंबईतील टोळीच्या साथीदारांना आदेश देत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com