व्हिडिओ
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील 'हे' रस्ते राहणार बंद
दादर परिसरात तीन दिवस रस्ते या दिवशी बंद राहणार आहेत.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. दादर परिसरात तीन दिवस रस्ते या दिवशी बंद राहणार आहेत.
दादरच्या चैत्यभूमी येथे 4 डिसेंबरपासून मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता 5 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 7 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
तीन दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.