Chandrashekhar Bawankule: 'वसुलीची गॅरेंटी' देणाऱ्यांनी मोदी गॅरेंटीवर बोलू नये' बावनकुळेंचा घणाघात

ज्यांनी 2.5 वर्ष ‘वसुलीची गॅरंटी’ दिली, त्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर बोलायचे नसते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागतात. परिणामी त्यांच्या संगतीत न राहणे पसंत करुन सहकारी सोडून जातात. असो, आपली मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो. पण, त्याचा अर्थ इतरांनाही तसेच समजण्याची गरज नसते. ज्यांनी 2.5 वर्ष ‘वसुलीची गॅरंटी’ दिली, त्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर बोलायचे नसते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आमची तुम्हाला विनंती आहे, या मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरा आणि मनसुख हिरेन, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं, वाझे, 100 कोटींची वसुली, पत्रा चाळीतून मराठी माणसांची लूट, सोशल मीडियातून लिहिणार्‍यांना घरात बोलावून मारहाण, कोविड काळात पत्रकारांना जेल, याकुबच्या कबरीवर रोषणाई, पालघर साधू हत्याकांड, खिचडी घोटाळा, इतके वर्ष मुंबईकरांची लूट, सत्ता टिकविण्यासाठी दिल्लीत मुजरे करण्यावर एकदा मनसोक्त बोला.त्यातच तुमच्या या अवस्थेचा उपचार दडला आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com