Mahanagari Express : महानगरी एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • महानगरी एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

  • रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

  • प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

( Mahanagari Express)महानगरी एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धमकी वजा संदेश लिहिलेला होता. तसेच गाडीमध्ये बॉम्ब असल्याची गंभीर सूचनाही देण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळताच तपास करण्यात आला तपासात कुठलीही अनोळखी वस्तू गाडीमध्ये आढळून आले नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र मेसेज मिळतात हायलाईट घोषित करण्यात आला असून रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

त्यामुळे अनोळखी वस्तू किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना, रेल्वे प्रशासनाला संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com