Pune Police Threat Call: मुंबईतील दोन ठिकाणं... पुणे पोलिसांना धमकीचा फोन

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची फोनवरून पुन्हा एकदा धमकी आली आहे. हा धमकीचा फोन पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला आला.
Published by :
Team Lokshahi

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची फोनवरून पुन्हा एकदा धमकी आली आहे. हा धमकीचा फोन पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला आला असून. मुंबईतील दोन ठीकाणी हा बॉम्बस्फोट होणार अशी माहिती देण्यात आली आहे. त्वरित पुणे पोलिस नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली.

फोनवरील व्यक्तीने पुणे पोलिसांना पुण्यातील शिवाजीनगर पिंपरी चिंचवड तर मुंबईतील वांद्रे आणि गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली आहे. शुक्रवारी दुपारी हा फोन पुणे पोलिसांना आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देत सतर्क केलं आहे. या प्रकरणात कोणतीही संशयीत घडामोड आढळून आलेली नसून पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com