Gopichand Padalkar : इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक,प्रकरण नेमकं काय?

गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांनी मारल्या चप्पला मारल्या आहेत. मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध करण्यात आला आहे.
Published by :
shweta walge

गोपीचंद पडळकरांना मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध करण्यात आला आहे. अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. इंदापूरमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा होता. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समाजाने केली. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केले. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com