Chinmay Mandlekar : मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

आजवर सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यशस्वीपणे साकारणाऱ्या अभिनेता चिन्मय मांडलेकरने यापुढे महाराजांची व्यक्तिरेखा न साकारण्याचा निर्णय घेत रसिकांना मोठा धक्का दिला आहे.

आजवर सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यशस्वीपणे साकारणाऱ्या अभिनेता चिन्मय मांडलेकरने यापुढे महाराजांची व्यक्तिरेखा न साकारण्याचा निर्णय घेत रसिकांना मोठा धक्का दिला आहे. मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे चिन्मयने एका व्हिडीओद्वारे घोषित केले आहे.

'फर्जंद', 'पावनखिंड', 'शेर सुभेदार', शिवरायांचा फत्तेशिकस्त', शिवराज', छावा' या चित्रपटांमध्ये चिन्मयने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. यातील चिन्मयच्या अभिनयाचे रसिकांनी कौतुक केले चिन्मयला आणि त्याच्या मुलाला याच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर काल चिन्मयची पत्नी नेहाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर चिन्मयनेही व्हिडीओद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com