महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 11वा दिवस

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज 11 वा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज 11 वा दिवस आहे. अधिवेशनाचा एक दिवस वाढवण्याची विरोधकांनी सरकारकडे मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी न झालेल्या कामकाजाची भरपाई करा अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज वाढवण्यावर आज निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरु आहे आणि आठवड्याचे पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होते. रेल्वेला त्याचा फटका बसला होता. मंत्री, आमदार अधिवेशनाला येऊ शकलं नव्हते. त्यामुळे त्या दिवसांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com