नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासननंतर ही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरूच आहे. रात्री 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळत आहे.
बैठकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. मुख्यमंत्री यांच्या विनंतीनंतर ही आंदोलन आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अल्टिमेटम देऊनही सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार नाही. त्यामुळे आज आंदोलकांकडून महत्त्वाच्या घोषणेची शक्यता आहे.
