व्हिडिओ
BKC मधील वाहतूक कोंडी सुटणार? पूर्व द्रुतगती महामार्ग ते BKC प्रवास होणार सुसाट
पूर्व द्रुतगती महामार्ग ते BKC प्रवास सुसाट होणार आहे. ‘BKC कनेक्टर’खालून जाणारी 'मिसिंग लिंक' पूर्ण झाली आहे. 180 मीटर लांबीच्या मार्गाचं काम पूर्ण झालं आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास आता सुसाट होणार आहे. ‘बीकेसी कनेक्टर’खालून जाणारी 'मिसिंग लिंक' पूर्ण झाली आहे. हा रस्ता सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाईल. यामुळे प्रवासातील 15 मिनिटांची बचत होईल.
बीकेसीतील ‘जी ब्लॉक’मधील भूखंड क्रमांक सी 80 आणि भूखंड क्रमांक सी 79 ला जोडणारा, ‘बीकेसी कनेक्टर’च्या खालून जाणारा असा हा नवा रस्ता आहे. सेबी इमारत एवेन्यू 5 आणि एवेन्यू 3 दरम्यानचा हा 180 मीटर लांबीचा रस्ता आहे. 3.98 कोटी खर्चाच्या आणि सहा मार्गिकांच्या या रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण केल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, बीकेसी परिसरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गर्दीच्या वेळी बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र आता वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात काहीशी मदत होईल.