व्हिडिओ
'विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली', उदय सामंतांची विरोधकांवर टीका
विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यांनी EVM वरुन विरोधकांवर टीका केली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, विरोधकांकडून महायुतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवरून विरोधकांकडून आरोप सुरू आहेत. 'जिंकले की EVM चांगलं, हरले की वाईट?' अशी टीका राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केली. त्यांनी म्हटलं की, विरोधकांची दुटप्पी भूमिका आता जनतेला कळली आहे. विरोधक प्रत्येक वेळी निवडणुकीत पराभव झाला की EVM चा मुद्दा उपस्थित करतात, मात्र जिंकल्यावर त्याच यंत्रणेचे कौतुक करतात, असे सामंतांनी सांगितले. त्यांच्या या टीकेमुळे विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.