Uday Samant : मविआवर उदय सामंतांचा सनसनाटी आरोप

दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमधून प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमधून प्रत्युत्तर दिलं आहे. दावोसला गेल्या कित्येक वर्षांपासून शिष्टमंडळ जातं. परंतु, दावोस दौऱ्याच्या हेतूवरच संशय घेतला जातो. पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे दावोस दौऱ्यासाठी कोणत्या अधिकारात गेले होते, असा सवाल सामंतांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

मविआ सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या, करार झालेला उद्योगपतीच गायब झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, महायुतीच्या काळात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. एअरबस प्रकल्पासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरु आहेत. एअर बसबाबत उद्योग खात्यात एक वाक्य दाखवा त्याक्षणी राजकीय निवृत्ती घेईन, असे खुलं आव्हानही उदय सामंतांनी विरोधकांना दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com