Uday Samant: दावोसचा दौरा कशासाठी? उद्योजकांचे महाराष्ट्राबाबत अनुभव काय? सामंत काय म्हणाले?
वर्ल्ड इकोनॉमीच्या फोरमच्या अनुशंगाने सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर असलेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 38,750 कोटींची गुंतवणूकीच्या अनुशंगाने एक मोठी कामगिरी केल्याच पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा दौरा असल्याचं कळत आहे. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी दावोसचा दौरा कशासाठी होता तसेच उद्योजकांचे महाराष्ट्राबाबत अनुभव काय याबद्दल सांगितल आहे.
एमओयुवर उदय सामंत म्हणाले
दरम्यान मंत्री उदय सामंत म्हणाले की, मला असं वाटत की स्थिर क्षेत्रातील ज्यांना आपण पौलादी पुरुष म्हणतो ते लक्ष्मी मित्तल मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या सगळ्यामध्ये मला असंवाटत की उद्योजकांना विश्वास देण आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनचं हे दावोस दौरे केले जात आहेत. यादरम्यान जे एमओयु होत आहेत त्याच्या नंतर आमच्यातले काही हितचिंतक त्याची अंबलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेवून आहेत.
आतापर्यंतचे सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी चार लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीतील सर्वांत मोठी गुंतवणूक जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाने तीन लाख कोटी रुपयांची केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोस दौरा सुरु
दावोस दौऱ्यात महाराष्ट्र सरकारला मोठं यश आलं असून डेटा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक विमानतळांच्या निर्माणाधीन कामाचा आढावा केंद्रिय नागरी उड्डयन मंत्र्यांनी आमच्या पॅव्हेलियनमध्ये येत घेतला. दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली दावोस दौऱ्याची यशस्वी परंपरा तिसऱ्या वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. असही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.