उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मी प्रवेशासाठी एकनाथ शिंदेंकडे अर्ज केलाय; राऊतांचा खोचक टोला
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बीकेसी मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्या संदर्भात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून, तेवढेच बाकी आहे आता, बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता, आम्ही तिघेच प्रवेश करायचे बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगतात, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब हे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत. दावोसमध्ये बसलेल्या उद्याेगमंत्र्यांनी जाहीर करावं की, आम्ही सर्व पक्षप्रवेश करणार आहोत. असे म्हणत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.