Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही बाहेर गेलो, तेव्हा ठाकरे यांनी मलाही फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांनी दिल्लीतही संपर्क साधून, यांना कशाला घेता, आम्हीच येतो असाही निरोप दिला होता. परंतु, त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. ५० आमदार माझ्यासोबत होते. त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यात वस्तुस्थिती आहे, असा दावा शिंदे यांनी केला. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com