Uddhav Thackeray - CM Devendra Fadnavis Meeting: विधानभवनात ग्रेट भेट! ठाकरे फडणवीसांच्या भेटीला
सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हे नागपुरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. सत्ताधारी आणि विकोधीपक्ष यांच्यामध्ये भेटीगाठी पाहायला मिळत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत एक नवा अध्याय सुरु झालेला पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही आमदार देखीस उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आहेत. ज्यामध्ये सचिन अहिर हे त्यांच्यासोबत होते, अनिल परब देखील त्यांच्यासोबत होते, वरुण सरदेसाई हे त्यांचे आमदार त्यांच्यासोबत गेलेले पाहायला मिळाले आहेत. सरकारने राज्याच्या हिताचे निर्णय घ्यावे ही भेट झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांची ही भेट 10 ते15 मिनिटची असली तरी त्यात आता काय चर्चा झाली याकडे सर्वांच लक्ष आहे.