Uddhav Thackeray: सरकार बदलल्यावर पोलिसाचा राक्षस होऊ शकतो?

जालन्यात काल मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

जालन्यात काल मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या या अमानुष आणि बेछुट गोळीबारामुळे मराठा समाज चांगलाच खवळला आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात असून काही ठिकाणी बंदही पुकारण्यात आला आहे. विरोधकांनी या हल्ल्यावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या हल्ल्याचा निषेध करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात एक फूल दोन हाफ आहेत. त्यांना आंदोलनाची माहिती नव्हती काय? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com