शिंदे गटाला कायमचे दरवाजे बंद? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

बीडच्या काही कार्यकर्त्यांसह अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला.

मुंबई : बीडच्या काही कार्यकर्त्यांसह अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई फक्त राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे. तसेच, बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असा आसूड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर ओढला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com