व्हिडिओ
Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, विश्वनाथ स्वामी भाजपमध्ये करणार प्रवेश
संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी भाजपमध्ये प्रवेश करणार. माजी नगरसेवकांसह ३५ जणांनी दिले राजीनामे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडला आहे. मंगळवारी (ता. २१) शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे.