Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. विविध क्षेत्रातून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत,आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. विविध क्षेत्रातून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत,आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. वाढदिवसानिमित्त काल रात्रीपासून कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर रांग लावलेली होती. तसेच उद्धव ठाकरेंचा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषात पार पाडत असल्याचं दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com