Udhhav Thackeray हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते, नितेश राणेंची टीका

उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे.
Published by :

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. खास राणे शैलीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला वाईट दिवस आले अशी खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाटी बदलावी लागेल, तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिपण्णी सुद्धा राणे यांनी यावेळी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com