Uddhav Thackeray : 'आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा'

आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वसमाजाच्या नेत्यांना बोलवून आरक्षणावर चर्चा करा असं ही उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल आहे.
Published by :
Team Lokshahi

आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वसमाजाच्या नेत्यांना बोलवून आरक्षणावर चर्चा करा असं ही उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल आहे. तर महायुतीचं सरकार असे पर्यंत आरक्षणावर मार्ग निघेल असं वाटतं नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मधल्या काळामध्ये सरकारनं आरक्षणावर नाटकं केली असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मराठा आरक्षणावर मोदींनाच तोडगा काढावा लागणार आहे असं ही उद्धव ठाकरे याठिकाणी म्हटले आहेत. तर आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास मोदींना पाठिंबा देऊ असं ही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. विरोधकांनी आपली भूमिका जाहीर करावी असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात होत आणि त्यानुसार शरद पवारांनी याआधी आपली भूमिका जाहीर केली होती आणि आता उद्धव ठाकरेंनी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com