Uddhav Thackeray BKC Speech | 'हम आपको काटेंगे' उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणावर?

“महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी जर मुख्यमंत्री असतो तर यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या होत्या. महाविकास आघआडीकडून मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली. “महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी जर मुख्यमंत्री असतो तर यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com