Union Budget 2024 : देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिप

सरकारकडून रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास कर्यक्रमांतर्गत तरुणांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi

आजच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेट मांडला आहे. यादरम्यान सरकारकडून रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास कर्यक्रमांतर्गत तरुणांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.

यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, ती म्हणजे 5 वर्षात एक कोटी तरुणांना एक वर्षाची इंटर्नशिप मिळणार आहे, तसेच या इंटर्नशिपसाठी दर महिन्याला पाच हजार म्हणजेच वर्षाला साठ हजार रुपये एकदाच दिले जाणार आहेत. त्या-त्या कंपन्यांनीकडून सीएसआर फंडमधून तरुणांना स्टायपेंड द्यायचा आहे अशी माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com