Unmesh Patil : तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील नाराज, ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

जळगाव भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. उन्मेष पाटील संजय राऊतांची भेट घेणार आहेत.

जळगाव भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. उन्मेष पाटील संजय राऊतांची भेट घेणार आहेत. उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील या मतदारसंधात नाराज आहेत.

या संदर्भात उन्मेष पाटील पहिले संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा करणार असल्याची माहिती आहे. स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर उन्मेश पाटील हे नाराज असल्याची चर्चा असून या संदर्भात ती आपली पुढील भूमिका जाहीर करतील अशी माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com