Unmesh Patil : उन्मेष पाटलांचं अखेर ठरलं! उन्मेष पाटील शिवसेना UBT प्रवेश करणार?

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते. अशातच उन्मेश पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com