Uttamrao Jankar On Ajit pawar: बारामतीत अजितदादांचा 20 हजार मतांनी पराभव; जानकरांचा दावा

बारामतीत अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झाला असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published by :
Prachi Nate

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 150 मतदार संघात गडबड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर म्हणाले आहेत. तर गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचा मतदारसंघ आहे, अजित पवार बारामती मतदारसंघात 20 मतांनी पराभूत आहेत, असा दावा यावेळी उत्तम जानकर यांनी केला आहे, त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com