Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी

उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे.
Published by :
Team Lokshahi

(Uttarakhand Pithoragarh Accident) उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. प्रवाशांनी भरलेली जीप खोल दरीत कोसळून थेट नदीत गेल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही जीप मुवानी गावातून बोक्ता गावाच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन सुमारे 150 मीटर खोल दरीत कोसळले. संध्याकाळी चारच्या सुमारास सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की जीपचा अक्षरशः चुराडा झाला.

जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने दरीतून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये चार महिला आणि एका शाळकरी मुलीचा समावेश आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढून ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. स्थानिकांनी त्वरित प्रशासनाला माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होते, ज्यापैकी पाच जण अद्याप उपचार घेत आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य गतीने पूर्ण करण्याचे आदेश देत जखमींना मोफत व तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com