Vande Mataram : उद्या मंत्रालयात वंदे मातरम् गायलं जाणार

'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तराज्यातील सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तराज्यातील सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मंत्रालयात वंदे मातरम् गायलं जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वंदे मातरम् गायलं जाणार असून बहुतांश मुस्लिम आमदारांचा मात्र वंदे मातरम् गायनाला विरोध पाहायला मिळतो आहे. सार्ध शताब्दी वर्षानिमित्त मंत्रालयात वंदे मातरमचे गायन करण्यात येणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना असून कौशल्य विकास विभागाकडून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com