Vasant More : वंचितचे वसंत मोरे 9 जुलैला शिवसेना UBTत करणार प्रवेश

वंचितचे वसंत मोरे शिवसेना UBTमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर आली आहे. तर सकाळीच राऊतांनी तसे संकेत ही दिले होते आणि आता हे सगळ खरं ठरताना दिसत आहे.
Published by :
Team Lokshahi

वंचितचे वसंत मोरे शिवसेना UBTमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर आली आहे. तर सकाळीच राऊतांनी तसे संकेतही दिले होते. तर वसंत मोरे यांनी मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

वसंत मोरे आधी मनसेमध्ये राज ठाकरेंसोबत होते आणि आता ते शिवसेना UBT म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे जाताना दिसत आहेत. तर वसंत मोरे यांनी थोड्याच वेळा आधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. लोकसभा निवडणूकीआधी ते वंचितमध्ये होते, आणि आता काही दिवसांवर विधानसभा आली आहे आणि ते शिवसेना UBTमध्ये प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com