Vasant More : थेट नकाशा दाखवत मोरेंनी सांगितली पुण्यात ताकद किती

पुणे लोकसभेची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. महिना झालेला आहे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केलेला आहे. पण आता पर्यंत कोणत्याही पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाही.
Published by :
shweta walge

पुणे लोकसभेची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. महिना झालेला आहे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केलेला आहे. पण आता पर्यंत कोणत्याही पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा झाली. तर कालच मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. तरी सुध्दा त्यांची राजकीय गणित जुळताना दिसत नाही आहेत. पण पुणे लोकसभा लढवण्यावर वसंत मोरे आजूनही ठाम आहेत.

पुणे लोकसभेचा नकाशा वसंत मोरे यांनी त्यांच्या ऑफीसमध्ये लावला आहे. आणि सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघामध्ये कशा पद्धतीचे नियोजन करता येईल यासाठी त्यांनी हे पोस्टर लावले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com