Vicky Kaushal Visit Raigad : अभिनेता Vicky Kaushal मराठमोळ्या पोशाखात रायगडावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक
शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून झाली आहे. सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे विकी कौशल याने या कार्यक्रमास उपस्थित लावली आहे. किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
विकी कौशलकडून मराठी भाषेत महाराजांना अभिवादन
याचपार्श्वभूमिवर बॉलिवूड अभिनेता आणि सध्या छावा चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनात स्थान करून राहिलेला अभिनेता विकी कौशल याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया मांडल्या आहेत. विकी कौशल म्हणाला की, "मला खुप छान वाटत आहे, महाराजांचे आशीर्वाद घेऊन आज घरी जाईन तर आज त्यामुळे मी आज खुप संतुष्ठ असल्यासारख वाटत आहे. शुटिंगच्या वेळेस खुप अडचणी आल्या पण माझ्यासोबत खुप चांगली टीम होती, असं विकी कौशल म्हणाला.
त्याचसोबत पुढे मराठी भाषेत बोलताना विकी कौशल म्हणाला की, शंभूराजेंनी ज्या यातना सहन केल्या त्यांच्यापुढे ही मेहनत तर काहीच नाही. असं म्हणत विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले".