Special Report | Vidhan Sabha Election Gharaneshahi | घराणेशाहीचा दबदबा | Lokshahi News

राज्यातील २३७ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार घराणेशाहीचे वारस असल्याचा आरोप, विशेष रिपोर्ट वाचा लोकशाही न्यूजवर.
Published by :
shweta walge

राज्यातील राजकारणात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचा आरोप कायमच होत आलाय. ही विधानसभा निवडणुकही त्याला अपवाद नाही राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल २३७ मतदारसंघांतील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस असल्याच समोर आलय. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी यांसंदर्भात मुद्दा उपस्थित आकडेवारी मांडलीय.

भाजपने १४९ जागा लढवल्या, त्यातील ४९ उमेदवार वारसाहक्काने आले.

काँग्रेसने १०१ जागा लढवल्या, त्यातील ४२ उमेदवार वारसाहक्काने आले.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ८६ जागा लढवल्या, त्यातील ३९ उमेदवार वारसाहक्काने

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनं ५९ जागा लढल्या त्यापैकी २६ उमेदवार हे घराणेशाहीतील होते

महायुतीचे एकूण ९४ उमेदवार घराणेशाहीतील

तर मविआचे १०० उमेदवार घराणेशाहीतले

अपक्ष निवडणूक लढणाऱ्यांमध्येही ४३ उमेदवार वेगवेगळ्या राजकीय घराण्यांमधलेच होते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com