Vijay Wadettiwar: उद्धव ठाकरे आणि शिंदेंना संपवल्यानंतर आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?
उद्धव ठाकरेंना संपवल्यानंतर आता शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी विचारलेला आहे. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेत नवा 'उदय' होण्याची शक्यता वर्तावली जात आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. काही असे उदय आहेत जे दोन्ही डग्यावर पाय ठेवून आहेत. नेमकं वडेट्टीवार काय सांगू पाहत आहेत.
दरम्यान विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपून नवीन' उदय' पुढे येईल... तो उदय कुठला असेल? त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल... ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात येईल...
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले मला असं वाटत की, उद्याचा शिवसेनेचा तिसरा नवा उदय जो येईल तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही... कारण काही उदय दोन्ही डब्यल्या हात मारून आहे. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवारांचा रोख कोणाकडे आहे हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.