व्हिडिओ
Vijay Wadettiwar meet Sharad Pawar : शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांमध्ये भेट,भेटीमागे दडलंय काय?
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी वडेट्टीवारांनी पवारांची भेट घेतली आहे. यासोबतच विजय वडेट्टीवार धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला देखील भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणावर महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विजय वडेट्टीवार बारामती मधील पत्रकारांच्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनालाही हजेरी लावणार आहेत.